कृषी योजने अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान 2022-23
केंद्रीय तपासणी संस्था औजारे तपासणी साठी कोणत्या आहेत ?
1. केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था (CMFTTI), बुधनी
2.उत्तर क्षेत्रीय केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था (NRFMTTI), हिस्सार
3. दक्षिण क्षेत्रीय केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था (SRFMTTI), गार्लैंडिन
4. उत्तर पुर्व क्षेत्रीय केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था (NRFMTTI), बीश्वनाथ चारीअली, आसाम.
शेतकरी यांनी काय कार्यवाही करणे आवश्यक आहे- यंत्र/ औजारे खरेदी केल्यानंतर ?
यंत्र/औजारे खरेदी करताना स्वत:च्या बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चेक/ धनादेश विक्रेत्यास रक्कम देणे बंधनकारक आहे. खरेदी केल्यानंतर शेतकरी यांनी देयकाची प्रत/पावती (जीएसटी क्रमांका सह) महाडीबिटी पोर्टल वर अपलोड करावी. त्यानंतर शेतास प्रत्यक्ष भेट देऊन कृषी अधिकारी मोका तपासणी करतील व देय अनुदानाची शिफारस करण्यात येईल. देय अनुदान लाभार्थीचे थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.
विविध औजारांसाठी अनुदानाची असलेली रक्कम -
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (50 टक्के)-
अ.ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) -125000/-
ब. पॉवर टिलर -
8 बीएच पी पेक्षा कमी - 65000/-
8 बीएचपी व त्यापेक्षा जास्त - 85000/-
क. स्वयंचलित अवजारे
रिपर कम बाइन्डर (3 व्हील) - 175000/-
रिपर कम बाइन्डर (4 व्हील) - 250000/-
रीपर - 75000/-
पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड ) - 25000/-
पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड ) - 35000/-
पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) - 63000/-
ड. ट्रॅक्टर (35 बिएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे
रोटाव्हेटर 5 फुट - 42000/-
रोटाव्हेटर 6 फुट - 44800/-
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) - 100000/-
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) - 250000/-
पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) - 20000/-
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 35000/-
कल्टी-व्हेटर - 50000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम - 70000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम - 89500/-
पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम - 40000/-
नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम - 50000/-
ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 125000/-
विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 75000/-
कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -100000/-
Chaff cutter- ( operated by engine/electric motor below 3 hp and power Tiller, and tractor of below 20 hp)- 50 टक्के, 20000/- रु.
Manually operated chaff cutter (above 3 feet)- 50 टक्के, रु.6300/-.
Manually operated chaff cutter ( upto 3 feet)- 50 टक्के, रु.5000/-.
अनुदान - इतर लाभार्थी यांना 40 टक्के
अ.ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी )-100000/-
ब. पॉवर टिलर -
8 बीएच पी पेक्षा कमी - 50000/-
8 एचपी आणि त्यापेक्षा जास्त - 70000/-
क. स्वयंचलित अवजारे
रिपर कम बाइन्डर (3 व्हील) - 140000/-
रिपर कम बाइन्डर (4 व्हील) - 200000/-
रीपर - 60000/-
पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड ) - 20000/-
पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 बीएचपी इंजीन ऑपरेटेड) - 30000/-
पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) - 50000/-
ड. ट्रॅक्टर (35 बीएचपी पेक्षा जास्त) चलितअवजारे
रोटाव्हेटर 5 फुट - 34000/-
रोटाव्हेटर 6 फुट - 35800/-
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी)- 80000/-
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर -(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त)- 200000/-
पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) - 16000/-
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 30000/-
कल्टीव्हेटर - 40000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम - 56000/-
पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम - 71600/-
पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम - 32000/-
पलटी नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम - 40000/-
ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर- 100000/-
विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर- 60000/-
कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -80000/-
Chaff cutter- ( operated by engine/electric motor below 3 hp and power Tiller, and tractor of below 20 hp)- 40 टक्के, 16000/- रु.
Manually operated chaff cutter (above 3 feet)- 40 टक्के, रु.5000/-.
Manually operated chaff cutter ( upto 3 feet)- 40 टक्के, रु.4000/-.
काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे यासाठी अनुदान-
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा-
मिनी दाल मिल- 60 टक्के,150000/-
मिनी राईस मिल- 60 टक्के,240000/-
पैकिंग मशीन- 60 टक्के 300000/-
सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर- 60 टक्के, 60000/-
सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर- 50 टक्के,100000/-
इतर लाभार्थी -
मिनी दाल मिल-50 टक्के, 125000/-
मिनी राईस मिल- 50 टक्के,200000/-
पैकिंग मशीन- 50 टक्के,240000/-
सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर-50 टक्के,50000/-
सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/Uninstall सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर- 40 टक्के,80000/-
अवजारां साठी बँक अनुदान आहे का?
होय. कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी 40 टक्के कमाल 24 लाख रु.अनुदान आहे. यामध्ये 10 लाख पासून 60 लाख पर्यंत औजारे खरेदी करता येतील.
यासाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी,कृषी विज्ञान केंद्र यांना हे अनुदान दिले जाते.
रु. 25 लाखावरील खरेदीसाठी बँक कर्ज घेणे बंधनकारक आहे. अनुदान क्रेडिट लिंकड बैक एन्डेड़ स्वरुपात बँकेच्या कर्ज खात्यावर जमा केले जाईल. कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी 4 वर्षापेक्षा कमी नसावा. अनुदानावर मिळणारी औजारे
पुढील किमान 6 वर्षे हस्तांतर/पुनर्वीक्री/गहाण ठेवता येणार नाहीत.
कृषी औजार बँके ची सेवा पुरवण्याची क्षमता किमान 10 हेक्टर प्रती दिवस आणि किमान 300 हेक्टर प्रती हंगाम असणे बंधनकारक आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा